आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लखपती दीदींचं संमेलन हे महाराष्ट्रामध्ये जळगावमध्ये होत आहे आणि जळगावच्या महिलांनी आज संख्येचे सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो. आताच आपण सगळ्यांनी लखपती दीदींसोबतंच इंटरेक्शन याठिकाणी बघितलं. कशाप्रकारे महिलांना संधी दिली तर त्या विश्व बदलू शकतात हे आपल्याला पाहायला मिळालं आणि देशाचे प्रधानमंत्री मोदीजी नेहमी सांगतात विकसित भारत करायचा असेल तर तो महिलांच्या माध्यमातूनच होऊ शकतो. महिला देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्यधारेत आल्या तरच विकसित भारत आपल्याला करता येईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बेटी बचाओ, बेटी पढाओपासून ते लखपती दीदीपर्यंत मोदींच्या नेतृत्वात महिलांचा हा जो विकास आपल्याला पाहायला मिळतोय तो अद्वितीय प्रकारचा विकास याठिकाणी आहे आणि मोदीजींनी तर 2029 पासून देशाचा कारभार महिलांनांच देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नारीशक्तीला कोणी रोखू शकत नाही. मोदीजींच्या आर्शीवादाने महाराष्ट्रामध्ये देखील आपण नारी सन्माचे कार्यक्रम सुरु केले असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आमच्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वात लाडकी बहिण योजना असेल किंवा आमच्या मुलींना मोफत शिक्षणाची योजना असेल किंवा अर्ध्या पैशामध्ये एसटीचं तिकीट असेल, गॅस सिलेंडरची योजना असेल या वेगवेगळ्या योजना या मोदीजींचं जे स्वप्न आहे की या भारताला विरसित भारत करायचा आणि त्याच्यामध्ये महिलांची भागीदारी असली पाहिजे ते पूर्ण करण्याकरिता महाराष्ट्र देखील कुठेही मागे राहणार नाही. आज महाराष्ट्रामध्ये 75 लाख परिवार हे बचत गटाशी जोडलेले आहेत. लवकरच ते 2 कोटीपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.