राजकारण

डंके की चोट पर सांगतो पुन्हा गुजरातच्या पुढे जाऊन दाखवू : फडणवीस

मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : अनेक उद्योग महाराष्ट्राबाहेर गेल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. यावर लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. कोणता उद्योग येईल? त्या सरकारचे नावच वसुली सरकार होते, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन ठाकरे सरकरावर केली आहे.

उद्योग काही १५ दिवसांत होत नाहीत. अडीच वर्षे ह्यांनी वाद केला. तो उद्योग यांचा खेटे घालत होता. कॅबिनेट कमिटीची एकही बैठक घेतली नाही. त्याचवेळी गुजरातने बैठक घेऊन १५ दिवसांत निर्णय दिला. आम्हाला कळाले तेव्हा आम्ही १५ दिवसांत निर्णय घेतला. पण तोपर्यंत उद्योग गेला होता. त्यांनीही तसे ट्वीट केले होते. उद्धव ठाकरे यांच्या काळात सॅफरॉन प्रकल्प गेला. त्याचे उत्पादन सुरु झाले

त्यानंतर एका माध्यमातून बातमी चालली. प्रकल्प राज्याबाहेर गेला व त्यानंतर सगळ्यांनी तशीच बातमी चालवली. उद्योगांबाबत महाराष्ट्राला नंबर वनवर आणू. उद्योगात आपण पाचव्या क्रमांकावर गेलो होतो. यावर्षी दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर होतो. पुढच्या वर्षी आपण पहिल्या क्रमांकावर येऊ याची ग्वाही देतो. तुम्ही वसुली सुरु केली होती. अशात कोणता उद्योग येईल? त्या सरकारचे नावच वसुली सरकार होते, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन ठाकरे सरकरावर केली आहे.

आता प्रचंड मोठी गुंतवणूक येत आहे. महाराष्ट्राला कोणी थांबवू शकतो नाही. आज १० राज्य स्पर्धेत आहेत. काही उद्योजक माझ्याकडे आले होते. आंध्रप्रदेश चांगली ऑफर देत असल्याचे त्यांनी सांगितले. मी म्हटलं ते कागदावर देत आहेत का? आधीच्या उद्योजकांना दिलेल्या सवलती मी आल्यावर पूर्ण केल्या. इतर राज्ये आश्वासन देतात पण त्याचे पालन करत नाहीत. आम्ही आश्वासने पूर्तता करतो, असेही त्यांनी म्हंटले आहे.

कोरोना काळात गुंतवणूक आली नाही हे चुकीचा समज आहे. त्या काळात सर्वात जास्त गुंतवणूक गुजरातमध्ये आली, हरियाणामध्ये आली. मी तर डंके की चोट पर बोलतो पुन्हा गुजरातच्या पुढे जाऊन दाखवू. याआधी गुजरातला मागे टाकले होते. पुन्हा मागे टाकू. पण वसुली करून ते होत नाही, असा टोला त्यांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.

कोरोनाचा पहिला काळ झाल्यानंतर दुसरा काळ हा संधीचा होता. फॅक्टरी ऑफ वर्ल्ड म्हणून चीन होते. या काळात त्याच्या भरवश्यावर राहता येत नाही. म्हणून इतरत्र गुंतवणूक करायची होती. युरोप व अमेरिका इंडस्ट्रीज या चीनमधून बाहेर पडल्या. त्या भारतात आल्या पण महाराष्ट्रात नाही. कारण तुम्ही बैठक घेतल्या नाहीत. वर्क फ्रॉम होममध्ये घरून बैठक घेता येते ना. १८ महिने तुम्ही बैठक घेत नाही. बँकेचे नियम असतात. घरी बसून काय काम केले ते माहिती नाही. सर्वात महत्त्वाची समिती आहे त्याची बैठकच होत नाही. १ लाख कोटींच्या गुंतवणूकीस मान्यता आम्ही दिली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी