छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्या पाठोपाठ आता आमदार रवी राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तू महाराष्ट्रभर फिरणं बंद कर. नाहीतर तुझ्या जीवाचं काही तरी करून टाकू. अचानक काही घडलं किंवा अपघात झाला तर मग म्हणू नको, तू एवढ्या वेळेस आमच्या विरोधात कसा काय बोलतो. आता हे सगळं थांबव नाही तर तुला संपून टाकतो, अशी धमकी राणांना देण्यात आली आहे.
आमदार रवी राणा यांना आलेल्या धमकी प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धमक्यांमुळे आता राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.