राजकारण

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही : छगन भुजबळ

ओबीसी एल्गार मेळाव्यात छगन भुजबळांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पंढरपूर : जेसीबी, हेलिकॉप्टर मधून फुलांचा वर्षाव होतोय ते गरीब आहेत. अनेक गरीब मराठा युवक मयत झाले. त्यांना श्रद्धांजली व्हा तुम्हाला मात्र आरक्षण पाहिजे. तुमचे वेगळे आरक्षण घ्या. तुम्हाला ओबीसी मधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही, अशी ठाम भूमिका छगन भुजबळांनी घेतली आहे. ते ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलत होते.

छगन भुजबळ म्हणाले की, सत्यशोधक सिनेमा सर्वांनी पाहा, आपला इतिहास समजला पाहिजे. फुलेंची लढाई ब्राम्हण समाजा विरोधात नव्हती ब्राम्हणवादा विरोधात होती. आज परिस्थिती बदलली आहे अन्याय करणारे बदलले आहेत. अन्याय करण्याऱ्यांच्या विरोधात सर्वांनी एकत्र या. चक्रवर्ती मल्हारराव होळकर यांचे चरित्र वाचा. विठ्ठल सगळ्या धर्माचा जातीचा आहे. संतांनी भेदाभेद दूर ठेवले. विठ्ठलाचे निवडणुकीमध्ये दर्शन घेतात त्यांना कुणी अडवत नाही मग आरक्षणावरून का अडवतात, असा सवाल त्यांनी केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण, फडणवीस यांच्यावेळी मी मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला. आरक्षणाच्या नावाखाली झुंडशाही चालणार नाही. मी थांबायला तयार आहे पण ओबीसीमधून आरक्षण मागणे चूक आहे. दगडफेक, गावबंदी करणे चूक आहे पिस्तूल दाखवणे चूक हे त्यांना सांगा. अमूक तारखेला आरक्षण मिळाले पाहिजे, सरकारवर दबाव टाकणे चूक आहे त्यांना सांगा. जे विरोधात गेले त्याची नावं आम्हाला माहिती आहेत. मतांची ताकत दाखवू, असेही त्यांनी म्हंटले आहे.

गरीब लेकरं दोनशे गाड्या घेऊन मुंबईला मैदान बघायला गेले. आरक्षण गरीब श्रीमंतवर दिलं जात नाही. दबलेल्या लोकांना समान संधी देण्यासाठी आरक्षण आहे. सामाजिक दृष्टीने किती मागास आहात त्यावर आरक्षण मिळते. आयएएस, आयपीएस, राज्य लोकसेवा आयोगात मराठा समाजाच्या जास्त जागा आहेत. मंत्री पदाची, आमदारकीची पर्वा नाही. मला मुख्यमंत्री पद, मंत्री पद नको. गोरगरिबांना न्याय देण्याचे सरकार आणू. आमची मुलं हुशार आहेत. मेरिस्ट लिस्टची आकडेवारी वाचून दाखवली, असेही भुजबळांनी सांगितले.

खऱ्या कुणबीबद्दल आमचे काही म्हणणे नाही. पण आज कुणीही कुणबी प्रमाणपत्र घेत आहे. जात गणना करा. तीन महिन्यात जात गणना करा. भाजपा, पवार साहेब, अजित दादा सगळे म्हणतात जातगणना करा म्हणता मग अडचण काय? असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच, गावागावातून मिरवणूक, कॅण्डल मार्च काढा, खोटे कुणबी शोधून काढा. प्रशासनाला खोटे कुणबी दाखवून द्या. गावागावांत लढा उभा करा, असे आवाहन छगन भुजबळांनी केले आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी