मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसची नेते छगन भुजबळ यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि चिन्हाबाबत भाष्य केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसची नेते छगन भुजबळ यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि चिन्हाबाबत भाष्य केलंय. जनता ठरवेल कुठली शिवसेना खरी आहे. त्यासाठी निवडणुका आवश्यक आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, मला काही जास्त सांगता येणार नाही. पण, शिवसेनेतून फुटून ज्यावेळी शिंदे साहेब आणि बाकी लोक फुटले, याचे स्क्रिप्ट दिल्लीतून नक्की झाले आहे. त्यांच्याकडे थिंक टॅंक आहे. महाराष्ट्रातील जनता काय म्हणते, हे बघावे लागेल. जनता ठरवेल कुठली शिवसेना खरी आहे. त्यासाठी निवडणुका आवश्यक आहे.
मला वाटतं की, समाज माध्यमे यामुळे सर्वदूर निशाणी आणि नावं जातं. शेवटी संघटनेचा प्रमुख कोण आहे, हेच लोक लक्षात घेतात. काँग्रेस देखील फुटली. तृणमूल काँग्रेस झालं, राष्ट्रवादी काँग्रेस झालं. जनता ठरवेल कुणाला ठेवायचं आणि कुणाला नेस्तनाबूत करायचं?
ते विरोधक आहे, आरोप करणारच. पण, त्यावेळी एकत्र बसून सगळ्यांनी निर्णय घेतला. आमच्या माहितीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे, सुभाष देसाई अशी काही नावं मुख्यमंत्री पदासाठी पुढे केली होती. पण, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यातील जे आमदार मंत्री होणार आहे, ते अनेक जण हे सिनियर आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना गळ घालण्यात आली. बाकी काही मला माहित नाही, असेही भुजबळ यांनी म्हंटले आहे.