मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या अनेक ठिकाणी सभा पार पडत आहे. या सभेतून ते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधत असतात.
याच पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाही मराठीच्या पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या कार्यक्रमामध्ये छगन भुजबळ यांची मुलाखत झाली.
या कार्यक्रमात बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, माझी लायकी नाही. मराठ्यांच्या हाताखाली आपण काम करायला पाहिजे. जरांगे साहेबांचे विधान योग्य आहे. माझी काय लायकी नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला जे सांगायचं ते सांगून झालंय. माझी अडचण असेल तर राजीनामा देईल मात्र ओबीसींच्या हक्काला धक्का लागून देणार नाही असे छगन भुजबळांनी लोकशाही पॉडकास्टमध्ये बोलताना म्हटले आहे.