chandrakant Khaire Team Lokshahi
राजकारण

धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तर... शिंदे गटाला चंद्रकांत खैरे यांचा इशारा

परवानगी नाही मिळाली तरी दसरा मेळावा शिवसेनेचाच

Published by : Sagar Pradhan

राज्यात एकीकडे राजकीय वर्तुळात गोंधळ घडत असताना आज शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकांवर घटनापीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावनीदरम्यान शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्हं गोठवण्यात यावे अशी मागणी शिंदे गटाच्या वकिलांनी केली. न्यायालयांनी प्रकरण प्रलंबित ठेवल्यानंतर या पुढील सुनावणी येत्या 27 सप्टेंबर रोजी ठेवली आहे. आता यावरच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर घणाघात केली आहे.

चिन्ह गोठवणं म्हणजे आमच्या छातीवर बाण मारल्यासारंख

खैरे बोलताना म्हणाले की, धनुष्यबाण चिन्ह गोठवणं म्हणजे आमच्या छातीवर बाण मारल्यासारंख आहे. चिन्ह गोठवलं तर शिवसैनिक अधिक आक्रमक होतील अशी संतप्त प्रतिक्रिया शिंदे गटाचा मागणीवर दिली आहे. पुढे बोलताना चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं की, ज्यांना शिवसेनेने मोठं केलं, ज्यांना नगरसेवक, आमदार आणि मंत्री केलं तेच आता शिवसेनेला विसरले आहेत. अशी जोरदार टीका यावेळी खैरे यांनी शिंदे गटावर केली.

परवानगी नसली तरी शिवसेनेचा दसरा मेळावा

अनेक वर्षापासून दसरा मेळावा घेण्याची शिवसेनेची परंपरा चालत आली आहे. मात्र शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे दसरा मेळावा कोण घेणार हा वाद उद्भवला आहे. त्यावरच आता खैरे म्हणाले की, परवानगी मिळाली तरी देखील आणि नाही मिळाली तरीही शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार असे विधान त्यांनी यावेळी बोलताना केले.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी