राजकारण

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला झटका! कॉंग्रेसची विजयी वाटचाल; आपचे डिपॉझिट जप्त

गुजरातेत ऐतिहासिक विजय मिळाला असला तरी हिमाचल प्रदेशमध्ये भाजपची पीछेहाट झाली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

शिमला : गुजरातसह हिमाचल प्रदेशाचाही निकाल आज हाती येत आहेत. गुजरातेत ऐतिहासिक विजय मिळाला असला तरी हिमाचल प्रदेशमध्ये भाजपची पीछेहाट झाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये कॉंग्रेसने मोठी आघाडी घेतली असून विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. तर, आपला खातेही उघडता आले नाही.

गुजरात आणि हिमाचलमध्ये आपला बालेकिल्ला वाचवण्याचे आव्हान भाजपसमोर असताना, काँग्रेसने या दोन्ही राज्यांतील निवडणुकीत भाजपला सत्तेतून बेदखल करण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे.हिमाचल प्रदेशात काँग्रेस बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचे दिसत आहे. काँग्रेस 40 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 25 जागांवर आघाडीवर आहे. 3 जागांवर अपक्ष पुढे आहेत.

हिमाचल प्रदेशात गेल्या ३५ वर्षांपासूनची दर ५ वर्षांनी सरकार बदलण्याची प्रथा आहे. यावेळीही तीच प्रथा कायम आहे. हिमाचल प्रदेशचे लोक भाजपकडून सत्ता काढून काँग्रेसच्या हाती देताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार, यावर आता चर्चा रंगली आहे.

काँग्रेसच्या प्रमुख प्रतिभा सिंह यांनी म्हंटले कि, निवडून आलेले आमदारच मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवतील. त्यांनी आपली निवड स्पष्ट केल्यानंतर पक्षाचे हायकमांड नाव जाहीर करेल. निवडणुकीबाबत राजीव शुक्ला यांच्याशी बोलणे शक्य झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, हिमाचल प्रदेशात भाजपने मागील निवडणुकीत 44 जागा मिळवल्या होत्या. तसेच, जयराम ठाकूर हा नवीन चेहरा दिला होता. मात्र, यावेळी भाजपला बहुमताचा 35 चा आकडाही गाठणं कठीण जाणार असल्याचं चित्र दिसत आहे. अशातच भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे स्वतः हिमाचल प्रदेशमधील असल्याने येथील पराभव भाजपच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी