Dhananjay Mahadik Team Lokshahi
राजकारण

भाजपच्या धनंजय महाडिकांचा दणदणीत विजय, शिवसेनेला मोठा दणका

सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस पहायला मिळाली

Published by : Shubham Tate

Rajya Sabha Election Result : राज्यसभा निवडणुकीच्या निमीत्ताने महाराष्ट्रात चांगलेच राजकीय नाट्य पाहायला मिळालं. तसेच 9 तासांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर निकाल हाती आले आहेत. महाविकास आघाडी सरकारने भाजपला धोबीपछाड दिला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी झाले. शिवसेनेचे नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी विजयी झाले. संजय पवार यांच्या पराभवामुळे शिवसेनेला मोठा दणका बसला आहे. संजय पवार यांना फक्त 33 तर धनंजय महाडिक यांना 41 मतं मिळाली आहेत. (BJP Dhananjay Mahadik won the Rajya Sabha)

दरम्यान, पियुष गोयल आणि अनिल बोंडे हे भाजपचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. प्रफुल्ल पटेल हे 43 मतं मिळवून विजयी झाले आहेत. तसेच संजय राऊतांना 42 मतं मिळाली आहेत. अनिल बोंडे यांना 48 मतं तर पियुष गोयल यांना 47 मतं मिळाली आहेत. तसेच इम्रान प्रतापगडी यांना 44 मतं मिळाली आहेत. सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस पहायला मिळाली. शिवसेनेच्या संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 तर भाजपच्या धनंजय महाडिक यांना 23 मतं मिळाली होती.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी