राजकारण

Ashish Shelar : धारावी पुनर्विकासाचे टेंडर ठाकरेंमुळेच अदानींना मिळाले

Published by : Siddhi Naringrekar

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने धारावी पुनर्विकास प्रकल्पासंबंधी अदानींविरोधात मोर्चाला पोलिसांनी अखेर परवानगी दिली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून ठाकरे गट 16 डिसेंबरला अदानी समूहाविरोधात मोर्चा काढणार आहेत.उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाची घोषणा केली. या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नव्हती मात्र आता या मोर्चाला परवानगी मिळाली आहे. ह्या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी मुंबईत करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आशिष शेलार म्हणाले की, मुंबईचा विकास म्हणजे ठाकरे गटाची पोटदुखी. धारावी पुनर्विकासाचे टेंडर ठाकरेंमुळेच अदानींना मिळाले. धारावीसे निकालेंगे मातोश्री 2 का खर्च. अदानी सिलेक्ट व्हावा म्हणून अटी शर्थी ठरवल्या कोणी उद्धवजींनी.

तसेच पुढे ते म्हणाले की, तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा अटी का घातल्या नाहीत. मुंबईला विकासासाठी काही मिळाले तर यांना पोटदुखी होते. उद्धवजींच्या काळात याचे टेंडर व टीडीआर ठरवण्यात आले. त्यात जर काही पाप असेल तर ते त्यांचेच पाप आहे. असे आशिष शेलार म्हणाले.

Satara : सातारा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ

पुणे हिट अँड रन प्रकरण; अल्पवयीन आरोपीविरुद्ध बाल न्याय मंडळात पोलिसांकडून अहवाल सादर

Amit Shah : केंद्रीय मंत्री अमित शाह 'या' दिवशी येणार मुंबई दौऱ्यावर

Sharad Pawar : आज पुण्यात शरद पवारांची सभा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुखोईच्या उड्डाणाची लवकरच चाचणी