जुई जाधव, मुंबई
शिवसेना नेते अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या परिषदेमध्ये अनिल परब यांनी अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात भाष्य केलं. काही दिवसांपुर्वी अंधेरी पोटनिवडणूक हा संपुर्ण राज्यात चर्चेचा विषय बनला होता.
उद्या अंधेरी पोटनिवडणूक होणार असून आज संध्याकाळी 5 वाजता निवडणुकीचा प्रचार संपणार आहे. तर काही लोकांना नोटा दाबण्यासाठी नोटा दिल्या जात आहेत. अशी टीका अनिल परब यांनी केलीय. अनिल परब यांनी यासंदर्भात रीतसर तक्रार दिली असल्याचंही म्हटलंय.
अनिल परबांनी कोणते मुद्दे मांडले?
रमेश लटके यांच्या प्रयत्नांना ऋतुजा लटके पूर्ण करतील
आम्ही पूर्ण शिवसेना त्यांच्या पाठीशी आहोत
आम्ही आवाहन करत आहोत की मोठ्या प्रमाणात मतदान व्हावं
काही लोकांना नोटा दाबण्यासाठी नोटा दिल्या जात आहेत
या संदर्भात मी निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे
ज्या भागात या घटना घडत आहेत त्यांची नावं देखील आम्ही दिली आहेत
जे काही त्यांचं अंतर्गत वाद आहे तो या निवडणूकित आणू नये
पोलिसांनी याच्या मागचा चेहरा शोधावा