baliram siraskar | chandrashekhar bawankule team lokshahi
राजकारण

बावनकुळेंनी दिला राष्ट्रवादीला धक्का, माजी आमदाराचा भाजप प्रवेश

चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत अकोल्यात बळीराम सिरस्कार भाजपचा झेंडा हाती घेतला

Published by : Shubham Tate

baliram siraskar chandrashekhar bawankule : राज्यात सत्तापरिवर्तन होताच आता पक्षांतराचे जोरदार वारे वाहू लागल्याचे दिसत आहे. सत्ताधाऱ्यांना चिटकून राहण्याकडे नेत्यांचा कल हा नेहमीच पहायला मिळत असतो. त्यामुळे सत्ताधारी भाजप व शिंदे गटात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आता अशातच अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. कारण बाळापूर मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. बळीराम सिरस्कार यांनी मुंबईत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 12 ऑगस्ट रोजी भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांचा अधिकृत प्रवेश सोहळा पार पडला आहे. (akola politics balapur ncp leader baliram siraskar joins bjp in chandrashekhar bawankule)

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाला एकविसाव्या शतकात सर्वोच्च स्थानावर न्यायचे आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला राज्यातील प्रत्येक बूथवर 50 युवा वॉरिअर्स उभे करायचे आहेत. या 25 लाख युवा वॉरिअर्सच्या जोरावर आगामी 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मोठे यश मिळवायचे आहे, अशी गर्जना चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी त्यांच्या कार्याला सुरूवात केल्याचे दिसत आहे.

तसेच आपल्याला आगामी काळात मुंबई महापालिका जिंकायची आहे. सर्व निवडणुकांमध्ये भाजपाच नंबर वन राहील यासाठी मेहनत करायची आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या यशाची परंपरा टिकवायची आहे, असं आवाहनही बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना करत नवी प्रेरणा दिल्याचे दिसत आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी