राजकारण

शरद पवारांना डिस्चार्ज तर छगन भुजबळ रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील तीन दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. आज मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले असून उपचार सुरू केले आहेत. सध्या भुजबळांची प्रकृती स्थिर असल्याचे समजत आहे.

छगन भुजबळ यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते. नाशिक येथील सिडकोचे कार्यालय औरंगाबाद येथे गेल्याने नाशिकच्या सिडको वसाहतीतील नागरिकांना कागदपत्रांच्या कामकाजासाठी नाहक औरंगाबादला चकरा माराव्या लागतील. त्यामुळे सिडकोवासियांसाठी असलेला हा अन्यायकारक निर्णय तात्काळ मागे घेऊन नाशिक येथील सिडकोचे कार्यालय पूर्ववत सुरु ठेवा, अशी मागणी करणारे पत्र छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते.

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली असून पवारांना आज सकाळीच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला असल्याचेही सांगण्यात येत आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी