राजकारण

रायगड घटनेवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, दुखःद

रायगडमध्ये खालापूर तालुक्यातील इर्शाळगड येथील वाडीवर दरड कोसळली आहे. यात 12 जणांचा मृत्यू झालेला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : रायगडमध्ये खालापूर तालुक्यातील इर्शाळगड येथील वाडीवर दरड कोसळली आहे. यात 12 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर, 100 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी युध्दपातळीवर बचावकार्य सुरु आहे. या घटनेवर राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी स्वतः इर्शाळगड येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, इर्शाळवाडीवर झालेली दुर्घटना भीषण आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे, मन सुन्न करणारी आहे. जोरदार पाऊस सुरु आहे. मदतकार्यात अडथळा नको म्हणून आम्ही खाली गावात थांबलो. एनडीआरएफ टीम व रुग्णवाहिका काम करत होते. सुखरूप राहा असे आवाहन करत होतो. पाऊस ओसरला तर मदतकार्यात मदत होईल. अनेकांचे नातेवाईक अडकले आहेत. आता प्रार्थना करुया, असे त्यांनी म्हंटले आहे.

तर, मणिपूरच्या धक्कादायक घटनेवरही आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मला यात राजकारण करायचे नाही. भयानक आहे. मी रात्री ट्वीट करतानाही विचार केला. महिलांना अशी वागणूक किंवा कोणालाही अशी वागणूक मिळाली नाही पाहिजे. ७० दिवस ही बातमी समोर आली नाही. तेथील मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. अंगावर काटा येण्यासारखे आहे. केंद्र सरकारने ठरविले तर एका दिवसात एका तासात बदल घडू शकतो. तिथे राष्ट्रपती राजवट लागायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, रायगड घटनास्थळी मदत कार्यासाठी NDRF, TDRF च्या टीमसह अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका दाखल आहे. यामध्ये 93 जणांना वाचविण्यात यश आले आहे. मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. तसेच, अंधार होऊ लागल्याने आजच्या दिवसाचे बचावकार्य थांबविण्यात आले आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी