मुंबई : जे गद्दार सोबत गेले त्यांचा गेम कसा केला हे सर्वांनाच दिसत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात खरा मुख्यमंत्री कोण हे सर्वांना कळलं आहे, असा निशाणा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर साधला आहे. शिंदे सरकारचे पहिले आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यावेळी ते बोलत होते.
खातेवाटपावरुन आदित्य ठाकरे म्हणाले की, जे गद्दार सोबत गेले त्यांचा गेम कसा केला हे सर्वांनाच दिसत आहे. मंत्रीमंडळ विस्तारात खऱा मुख्यमंत्री कोण हे सर्वांना कळलं आहे. अपक्षांना, महिलांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. मुंबईकरांनाही काही स्थान देण्यात आलेलं नाही. सर्वात प्रथम जाणारे निष्ठावंतांनाही स्थान दिलेले नाही. निष्ठेला ते मानात नाही हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
ज्या निष्ठावंतांना स्थान दिलं आहे त्यांनाही कमी लेखलं आहे. आमच्याकडे बरे होते असं झालं आहे. तिथे जाऊन ते अडकले आहेत. आता दरवाजे खुले आहेत का असं त्यांना वाटत असेल. तर, दरवाजे अद्यापही खुले आहेत. पण ज्यांना तिथे राहायचं असेल त्यांनी आमदाराकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावं, अशी ऑफर आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना दिली आहे.
संतोष बांगर यांच्या प्रकरणाविषयी बोलताना ते म्हणाले की, ही गुंडगिरीची भाषा कधीही मान्य नव्हती. नव्या पक्षात मान्य आहे का, असा सवालही त्यांनी विचारला. तसेच, मुख्यमंत्री किंवा खरे मुख्यमंत्री यांचा अंकुश राहिला नसल्यानेच गुंडगिरीची भाषा वापरली जात आहे, असे म्हणत त्यांनी सूचक विधान केलेले आहे.
त्यांचा मी राजीनामा मागणार नाही, पण जनता यांना त्यांचे स्थान दाखवून देईल. जनतेला धमकावणारे आमदार असे उघडपणे फिरणार असतील, तर यापुढे राज्यात कायदा सुव्यवस्थेची काय अवस्था होईल याचा अंदाज येतो, अशीही टीका त्यांनी केली आहे.
दरम्यान, हे सरकार लवकच कोसळेल. हे घटनाबाह्य सरकार आणि बेईमानीच आहे. ज्या लोकांशी निष्ठा माणसांशी पक्षांशी नाही राहीली. ते अशा लोकांबरोबर काय राहतील त्यांना तिथे जाऊनच काहीच नाही मिळाले नाही, अशीही टीकास्त्र आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर साधला आहे.