राजकारण

Aditya Thackeray : जे गेले त्यांच्या रक्तात शिवसेना नव्हतीच ते गद्दारच

शिवसंवाद यात्रेत आदित्य ठाकरेंचे शिंदे गटावर टीकास्त्र

Published by : Shweta Shigvan-Kavankar

भिवंडी : शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिवसंवाद यात्रेस सुरुवात केली असून प्रमुख शहरात दौरा केला आहे. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर शरसंधान साधले आहे. खाऊन अपचन झालेले तेच सोडून गेले, असा टोला त्यांनी बंडखोरांना लगावला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, मागील 1 महिना म्हणजेच 20 जून ते 20 जुलैपर्यंत महाराष्ट्रात वेगळे वातावरण होते. हे खूप क्लेशदायक होते. हे दुःख विसरण्यासाठी दौरा आहे. ते धोका देऊन गद्दारी करुन सोडून गेले. महाराष्ट्रातील सर्कस न पटणारी. मंत्रीपद, हवी ती मदत देऊनही असे काय बिघडले की त्यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला. तरीही कुठेही शिवसेना हललेली नाही. खाऊन अपचन झालेले तेच सोडून गेले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोणताही भेदभाव न करता राज्यात सेवा केली. 80 टक्के राजकारण 20 टक्के समाजकारण हेच शिवसेना करते. परंतु, आपले हेच चुकले की आपल्याला राजकारण जमले नाही. म्हणून आपल्यावर ही वेळ आली. आपण विरोधी पक्षाला सतावले नाही. स्वतःच्या आमदार-खासदारांवर लक्ष ठेवले नाही. त्यांच्यावर अंधश्रध्दा होती आणि तेच सोडून गेले, असेही त्यांनी म्हंटले आहे.

जे गेले ते त्याच्या रक्तात मुळात कधीच शिवसेना नव्हती. अनेक जण म्हणतात आम्ही बंड केला, उठआव केला. पण, बंड करायला हिंमत लागते. बंड करायाचे असते तर सुरत, गुवाहटीला पळून गेले नसते. आसाममध्ये गंभीर पुरपरिस्थिती असूनही हे 40 लोक मजा करुन आले. पक्षप्रमुखाला जाऊन भेटून सांगण्याची त्यांची हिंमत झाली नाही. काहीतरी दडपण असल्यामुळेच ते गेले, अशी टीका त्यांनी केली,

राष्ट्रपती मतदानासाठी शिवसेनेने दौपदी मुर्मु यांना पाठिंबा देऊनही बंडखोरांना हॉटेलमधून कैद्यांसारखे आणले. बसमधून आणले. आणि कसे मतदान करत आहे यावर लक्ष ठेवले. या आमदारांची काय हालात झालीये. तिथे गेलेत आनंदात राहा. आमच्या मनात राग नाही. परंतु, दुख आहे की बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्राच्या पाठित खंजीर खुपसून गेले. जिथे राहयचे असेल तिथे राहा. पण, आमदारकींचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जा, असे आव्हानही आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना दिले आहे.

राज्यातील पुर परिस्थितीमुळे जनता त्रस्त आहेत. आणि ते दिल्लीत जाऊन बसले आहेत. दोन जणांची मंत्रिमंडळ घटनाबाह्य असून हे सरकार कोसळणार लिहून घ्या.

राजकारण करायचे पण पातळी सोडायची नसते. ही राजकीय गद्दारी नाहीतर माणुसकीशी गद्दारी आहे. उध्दव ठाकरेंवर हॉस्पिटलमध्ये एकाच आठवड्यात दोन सर्जरी झाल्याने ते बेडवरुन हलू शकत नव्हते. आणि शिंदे गट उध्दव ठाकरे आम्हाला भेटत नसल्याचा आरोप करतात. मी मुलगा म्हणून त्यांच्या वेदना जवळून पाहिल्या आहेत. त्यांना एवढा त्रास होत असतानाही उध्दव ठाकरेंनी सर्वांशी फोनवरुन संवाद साधला. मंत्र्यांची बैठक घेतली. परंतु, ही वेळ साधून फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले, असे त्यांनी म्हंटले आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

Kokan Vidhansabha: रत्नागिरीत सामंत तर सिंधुदुर्गात राणे बंधूंची हवा

Sanjay Rathore Win Digras Vidhan Sabha Election Result 2024; दिग्रस मतदारसंघात संजय राठोड पाचव्यांदा विजयी

Uddhav Thackeray: विधानसभेचा निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित: उद्धव ठाकरे