मुंबई : वेदांता-फॉक्सकॉनपाठोपाठ एअरबस-टाटा हवाई दलासाठी विमान निर्मितीचा २२ हजार कोटींचा प्रकल्पही गुजरातला गेला आहे. यामुळे शिंदे सरकारला मोठा धक्का बसला आहे. तर, विरोधकांनी आता शिंदे-फडणवीसांवर टीकेची झोड उठवली आहे. आपले मुख्यमंत्री मंडळाने दहीहंडी राजकीय भेटी फोडाफोडी हे सोडून काही केलेले नाही, असे टीकास्त्र शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरेंनी सोडले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, चार प्रकल्प गेले. मिहानमध्ये एअर बस प्रकल्प आणू म्हणून आधी का सांगितलं, असा सवाल त्यांनी उदय सामंतांना विचारला आहे. या खोके सरकारनं एकही उद्योग राज्यात ठेवला नाहीयं. आपले मुख्यमंत्री मंडळाने दहीहंडी राजकीय भेटी फोडाफोडी हे सोडून काही केलेले नाही. दुसऱ्या राज्यात जाऊन मुख्यमंत्री यांनी काही आणलेलं नाही. राज्यात हे काय गुंतवणूक आणणार, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
कृषिमंत्रीच कोण आहेत हे शेतकऱ्यांना माहित नाही. उद्योजकांना उद्योग मंत्री माहित नाही या राज्यात चाललंय काय, असाही प्रश्न आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला विचारला आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्यांचं तरी एक इंजिन फेल का होतंय? त्यापेक्षा तर आमच केंद्रासोबत चांगलं चाललं होतं. आमच्या काळात कोविड च्या काळात साडेसहा हजार कोटी आणले. दोन चायनीज कंपनी सोबतचं काम थांबवलं, असेही त्यांनी म्हंटले आहे.
राज्याच्या राजकारणात आमदार रवी राणा विरुद्ध आमदार बच्चू कडू असा वाद चांगलाच पेटला असल्याचं पाहायला मिळतंय. कडू व राणा या दोघांकडूनही एकमेकांवर जोरदार हल्लाबोल सुरू आहे. अशातच बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना 1 तारखेचा अल्टीमेटम दिला आहे. तसेच, माझ्यासोबत 18 आमदार असल्याचा इशाराही दिली आहे. याबाबत विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले, बचू कडू यांनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही ठरवू, असे त्यांनी सांगितले.