राजकारण

छोटे पप्पू मंत्री होते तेव्हाच प्रकल्प राज्याबाहेर; सत्तारांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

वेदांता-फॉक्सकॉनपाठोपाठ एअरबस-टाटा हवाई दलासाठी विमान निर्मितीचा २२ हजार कोटींचा प्रकल्पही गुजरातला गेला आहे. यावर आता अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

हिंगोली : वेदांता-फॉक्सकॉनपाठोपाठ एअरबस-टाटा हवाई दलासाठी विमान निर्मितीचा २२ हजार कोटींचा प्रकल्पही गुजरातला गेला आहे. यावरुन विरोधकांनी आता शिंदे-फडणवीसांवर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर आता अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरेंचा पप्पू संबोधित केले आहे.

अब्दुल सत्तार म्हणाले की, वेदांता प्रकल्प 2021 लाच गुजरातला गेला होता. त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. व छोटे पप्पू देखील मंत्री होते, असा टोला आदित्य ठाकरे यांचे नाव न लगावला आहे. तेव्हा त्यांनी प्रकल्प का थांबवला नाही. सुभाष देसाई राज्याचे उद्योग मंत्री होते त्यांनी पाप केले आणि ते पाप आमच्या सरकारवर लावले, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

तो प्रकल्प कधी बाहेर गेला आणि कसा गेला? तेव्हा नेमकी काय तारीख होती? हे बारकाईनं पाहिलं तर त्यांच्या सगळं लक्षात येईल. 21 सप्टेंबर 2021 ला हा प्रकल्प गुजरातला गेला. याची काय कारणे होती. त्याची राज्य सरकारने चौकशी करायला हवी, अशी मागणी देखील सत्तारांनी केली आहे.

काय आहे प्रकल्प?

सी-२९५ विमानांचा पहिला ताफ्यातील १६ विमाने सप्टेंबर २०२३ ते ऑगस्ट २०२५ या काळात मिळणार आहे. उर्वरित ४० विमाने ही टाटा अ‍ॅडव्हान्स सिस्टीम्स या कंपनीच्या भागीदारीतून भारतात तयार केली जातील. भारतात बनलेले पहिले विमान सप्टेंबर २०२६मध्ये वायूदलाच्या ताफ्यात येईल. युरोपच्या बाहेर सी-२९५चे उत्पादन होण्याची देखील ही पहिलीच वेळ आहे. अशा 40 विमानांची निर्मिती टाटा ऍडव्हान्स सिस्टीम करणार आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी