थोडक्यात
भाजपपाठोपाठ काँग्रेसनं महाराष्ट्रात उतरवली नेत्यांची फौज
काँग्रेसचे 2 मुख्यमंत्री आणि 1 उपमुख्यमंत्री आज मुंबईत पत्रकार परिषद घेणार
तेलंगणा, कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर
विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.
राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपपाठोपाठ काँग्रेसनं आता महाराष्ट्रात नेत्यांची फौज उतरवल्याचे पाहायला मिळत आहे.
काँग्रेसचे 2 मुख्यमंत्री आणि 1 उपमुख्यमंत्री आज मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. भाजपच्या आरोपांना प्रतिउत्तर देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. काँग्रेसने तेलंगणा कर्नाटकमध्ये दिलेल्या आश्वासनांकडे पाठ फिरवली असा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार हे पत्रकार परिषद घेणार आहेत.