काल केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिले. त्यामुळे या निर्णयाचा मोठा धक्का ठाकरे गटाला मिळाला आहे. आधीच बंडखोरीमुळे कमजोर झालेला ठाकरे गट आता नाव आणि चिन्ह गेल्यामुळे जास्तीच कमकुवत झाला आहे. त्यातच राजकीय वर्तुळात गदारोळ निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटातील दोन खासदार आणि 10 आमदार शिंदे गटात येतील, असा मोठा दावा शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे.
काय म्हणाले शिंदे गटाचे खासदार?
शिवसेना नाव आणि पक्ष मिळाल्यानंतर शिंदे गटाची बाजू आता भक्कम झाली आहे. दरम्यान, शिंदे गटातील नेत्यांकडून अनेक वेगवेगळे दावे करण्यात येत आहे. त्यातच आता शिंदे गट खासदार कृपाल तुमाने यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, त्यांच्याकडे असलेल्या 16 आमदारांपैकी आणखी 10 आमदार आणि दोन खासदार शिंदे गटात येतील. तसेच विदर्भातील माजी आमदार आले होते. आता उरलेसुरले सर्व पदाधिकारी आणि आमदार आमच्या शिवसेनेत येतील. धनुष्यबाण चिन्ह आपले आहे. बाळासाहेबांची परंपरा जोपसण्याचं काम आम्ही करतोय. ते काम आम्ही करत राहू. असा दावा त्यांनी केला आहे.
शिंदे गट व्हीपच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाच्या आमदारांना अडचणीत आणणार?
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे 9 तारखेला राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व शिवसेना आमदारांना बजवणार व्हीप बजावणार आहे. हा व्हिप उध्दव ठाकरेंसह ठाकरे गटातील आमदारांना पाळावा लागणार आहे. व्हिप न पाळाल्यास ठाकरे गटाच्या आमदारांवर कारवाई करण्याची शक्यता आहे. यामुळे आता ठाकरे गट आता चांगलेच अडचणीत सापडली असून त्यांचे पुढचे पाऊल काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.