भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओप्रकरणी तपास सुरु असतानाच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने लोकशाही मराठी न्यूज चॅनलला नोटीस बजावत 72 तासांसाठी लोकशाही मराठी न्यूज चॅनेल बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतुलोकशाही चॅनल पुन्हा आपल्या सेवेत येणार आहे. 24 तासांच्या आत लोकशाही पुन्हा प्रेक्षकांच्या सेवेत रुजू होणार आहे. याबाबत लोकशाही मराठीचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांनी ट्टीटवर (एक्स) च्या माध्यमातून मोठी माहिती दिली आहे.
नेमकं काय म्हणाले कमलेश सुतार ट्वीटमध्ये?
लोकशाही आज रात्रीपासून पुन्हा सुरु करण्याचे निर्देश दिले.
MIB च्या दिनांक 22.09.2023 च्या आदेशानुसार, लोकशाही मराठीला 72 तासांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
या आदेशाला आम्ही दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
आज, प्रदीर्घ सुनावणीनंतर, माननीय उच्च न्यायालयाने MIB च्या निर्देशांना स्थगिती दिली आहे आणि पुढील आदेश येईपर्यंत आज रात्रीपासून वाहिनी पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले.