Uddhav Thackeray, Kirit Somaiya Team Lokshahi
महाराष्ट्र

Kirit Somaiya : मुख्यमंत्र्यांवर टीका करताना सोमय्यांची जीभ घसरली म्हणाले...

मालमत्ता कराच्या पावत्या दाखवत सोमय्यांनी परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं

Published by : Shweta Chavan-Zagade

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरील ईडीच्या (ED) कारावाईनंतर आता आरोपप्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले आहे. ईडीच्या छापेमारीनंतर अनिल परब यांनी त्या रिसॉर्टशी आपला संबंध नसल्याचा दावा केला. अनिल परब (Anil Parab) यांच्या दाव्यानंतर आज (27 मे) भाजप नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) यांनी पत्रकार परिषद घेत पलटवार केला. मालमत्ता कराच्या पावत्या दाखवत सोमय्यांनी परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीकास्त्र डागलं. तसेच यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका करताना सोमय्या यांची जीभ घसरली आहे.

सोमय्या म्हणाले, 'माणूस एव्हढा नाटकी बनू शकतो, हे उद्धव ठाकरेंनी आपल्याला दाखवून दिलं. अनिल परब म्हणतात तो मी नव्हेच. त्या रिसॉर्टशी माझा काही संबंध नाही. १२ मुद्दे मी काढले आहेत. त्याची उत्तर अनिल परब का देत नाहीत. अनिल परब म्हणतात, ते कशासाठी आले होते मला माहिती नाही.'

'माझा त्या रिसॉर्टशी काही संबंध नाही. तो रिसॉर्ट सदानंद कदमचा आहे. अनिल परब साहेब, माझ्याकडे १७ डिसेंबर २०२० ची एक पावती आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, अनिल परब पर्यावरण मंत्री. अनिल परब रत्नागिरीचे पालकमंत्री. त्याच रत्नागिरीतील दापोलीत असलेल्या मुरूड गावात ग्रामपंचायतीची पावती आहे,' असं सोमय्यांनी सांगितलं.

'अनिल परब यांनी २०२०-२१ मध्ये रिसॉर्टचा मालमत्ता कर भरला. त्याची पावती आहे. तो मी नव्हेच, नाट्यकार अनिल परबांनी यांचं उत्तर द्यावं. दुसरी पावती आहे, ती नोव्हेंबर-डिसेंबर २०१९ मधील. २०१९-२० मध्येही या रिसॉर्टचा मालमत्ता कर, दिवाबत्ती कर अनिल परब यांनी भरला आहे. हा रिसॉर्ट सदानंद परबचा आहे, तर अनिल परब घरपट्टी तुम्ही का भरत होतात?,' असा सवाल सोमय्यांनी केला.

'२०१९-२० मध्ये मालमत्ता कर अनिल परबांनी भरला आहे. १६,६८३ चौरसफूट बांधकाम. हे रिसॉर्ट कुणाचं? घर क्र. १०६२ कुणाच्या नावाने अनिल परब यांच्या नावाने. आणि नाट्यकार अनिल परब सांगतात, त्या रिसॉर्टशी माझा संबंध नाही.'

'फसवणूक, चोरी, लबाडी, डाकूगिरी, माफियागिरी यासाठी उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांना नोबेल पुरस्कार मिळेल. उद्धव ठाकरेंनी बंगल्याबद्दल नाटकं केलं. अनिल परबांनी महावितरणला अर्ज केलाय. मुख्यमंत्री अनिल परबांचा फोटो ओळखतात की नाही. असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितला नाही. मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन अनिल परब सांगतात की, माध्यमांना फसवलं, गंडवलं,' असं म्हणत सोमय्यांनी उद्धव ठाकरे आणि परबांवर हल्ला चढवला.

नेमंक प्रकरण काय?

दरम्यान, अनिल परब यांच्यावर ईडीनं (ED) धाड टाकली असून त्यांच्या निकटवर्तींयांवरही ईडीकडून धाडी टाकण्यात आल्या आहेत. दापोली रिसॉर्ट संदर्भातील कथित जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अनिल परबांवर कारवाई करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परबांवर तोफ डागत हा कथित घोटाळा उघडकीस आणल्याचा दावा केला होता. अनिल परब यांनी लॉकडाऊन काळात शेतजमिनीवर रिसॉर्टचं बांधकाम करून फसवणूक केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी