दोन वर्षानंतर आता कुठे कोरोनाचे संकट काहीसे दूर होत असताना, अशातच आता देशात H3N2 या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. सोबत राज्यात देखील हा विषाणू पसरत असल्याचे दिसून येत आहे . त्यामुळे राज्य सरकार आणि आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत जनतेला आवाहन केले आहे. सर्वांनी मास्क वापरावा, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा. सोबतच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. असे ते म्हणाले आहे.
काय केले तानाजी सावंत यांनी आवाहन?
देशासह राज्यात सध्या H3N2या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळेच आरोग्यमंत्र्यांनी जनतेला काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ते म्हणाले की, देशभरात इन्फ्लुएंझाचे रूग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातही रूग्ण वाढत आहेत. या व्हायरसचा संसर्ग वाढतो आहे. मात्र, काळजीचे काहीही कारण नाही. मी लोकांना हे आवाहन करू इच्छितो की त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावे. जर लोकांना गर्दीच्या ठिकाणी जायचे असेल तर त्यांनी मास्क आवर्जून लावावा. तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचंही पालन करावे. असे आवाहन त्यांनी केले आहे.
काय आहेत या नव्या विषाणूचे लक्षणे?
WHO ने दिलेल्या माहितीनुसार H3N2 च्या रूग्णांमध्ये खोकला, कोरडा खोकला, ताप, डोकेदुखी, सांध्यांमध्ये दुखणं, थकवा येणं, गळ्यात खरखर आणि नाक वाहणं ही लक्षणं दिसतात.
अशी घ्यावी काळजी?
गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क आवर्जून लावा
आपले डोळे आणि नाक यांना वारंवार स्पर्श करू नका
खोकला आल्यावर किंवा शिंक आल्यावर तोंडावर रूमाल ठेवा
अंगदुखी किंवा ताप आला तर पॅरासिटामोल घ्यावी