महाराष्ट्र

...अन् त्याने चक्क रक्ताने लिहिले उद्धव ठाकरे यांना पक्ष निष्ठेचे पत्र!

Uddhav Thackeray यांना कट्टर शिवसैनिकाने चक्क स्वताच्या रक्ताने लिहिले पत्र; पक्षनिष्ठ असल्याची दिली हमी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

उदय चक्रधर | भंडारा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज 62 वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांच्यावर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अशात भंडारामधील एका कट्टर शिवसैनिकाने चक्क आपल्या रक्ताने उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पक्ष निष्ठेची हमी दिली आहे.

महाराष्ट्रात सध्या उलथापालथ व नवनविन घडामोडी सुरू आहेत. शिवसेना उध्दव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या दोन गटात खरी शिवसेना आमचीच असे दावे रोजच्या रोज होत आहेत. त्यात मुख्य शिवसेनेची दिवसेंदिवस डोकेदुखी वाढत आहेत. शिवसेनेला आता खरी शिवसेना हीच आहे, असे सिध्द करण्याचे आव्हान येऊन ठेपले आहेत.

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घालत प्रत्येक तालुक्यातून शिवसैनिकांना प्रतिज्ञापत्र लिहून देण्याचे आव्हान केले होते. याच आव्हानाला साथ देत तुमसर तालुक्यातील परसवाडा शिवसेना युवा शिवसैनिक पवन खवास नामक तरुणाने स्वतःच्या रक्ताने उद्धव ठाकरे यांना पक्ष निष्ठेने प्रेमपूर्वक निष्ठेने पत्र लिहले आहे.

सदर रक्ताने लिहलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने त्या शिवसैनिकांची चर्चा रंगली आहे. सदर पत्राची दखल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुध्दा दखल घेतली व पवन खवास या शिवसैनिकांवर पक्ष निष्ठेचे कौतुकांची थाप दिली आहे.

दरम्यान, शिवसैनिकांच्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे हे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत. पण फक्त शुभेच्छा द्या, हारतुरे नको, पुष्पगुच्छ आणि फोटोफ्रेम्स नको. केवळ तुमचे निष्ठापत्र द्या, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : मोठा धक्का; लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख पराभूत; भाजपचे रमेश कराड यांचा विजय

Mahim Assembly Election Results 2024: माहीम विधानसभा मतदारसंघाच्या तिरंगी लढतीमध्ये महेश सावंत विजयी

Ajit Pawar: शरद पवारांना धक्का, बारामतीमधून अजित पवार विजयी

जालन्यात शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर विजयी

Sanjay Upadhyay Wins: बोरिवलीमधून संजय उपाध्याय विजयी