महाराष्ट्र

पुण्यात लव्ह जिहादची घटना? चार वर्षांनंतर पीडित मुलगी सापडली अन्...

भाजप नेते गोपीचंद पडळकर पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमोल धर्माधिकारी | पुणे : द केरला स्टोरी चित्रपटामुळे लव्ह जिहाद मुद्दा सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. असेच प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी भाजप नेते गोपीचंद पडळकर पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.

दहावीचा पेपर झाल्यानंतर चार वर्षांपासून पीडित मुलगी बेपत्ता होती. एका मुस्लीम युवकाने मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याचे समजत आहे. याप्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी पडळकरांनी केली आहे. पवारांची पोरगी म्हणते लव्ह जिहाद माहिती नाही. त्याची व्याख्या माहिती नाही. त्यांनी या मुलीला भेटावे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून लव्ह जिहाद प्रकरण समोर येत आहेत. कालच एक घटना हिंदू समाजाच्या मुलीला चार वर्षांपूर्वी एका मुस्लीम तरुणांने फुस लावून पळवून घेऊन गेला होता. पोलिसांत प्रकरण दाखल झाले व तपास सुरू झाला. केरला स्टोरी आला तेव्हा आपल्याही मुलीसोबत अस घडलं असेल अस म्हणून तपास सुरू केला आणि तो मुलगा मंचरमध्ये सापडला आहे. मुलीला लॉक करून ठेवलं होतं. त्या मुलीला समजून सांगून घरी घेऊन आले. बुरखा घालून मुलगी त्यांच्या घरी होती. मुलीच्या अंगांवर सिगारेट चटके दिले होते, गैरप्रकार करायला लावत होते. या मुलीला गोळ्या दिल्या जात होत्या. प्रिस्क्रिप्शन सापडले आहेत. तिची बोलण्याची आता मानसिकता नाही, ती घाबरली आहे, असे गोपीचंद पडळकरांनी सांगितले आहे.

त्या मुलाची बहीण हिची मैत्रीण होती. तिने त्याच्यासोबत मुलीची ओळख करून दिली होती. मुलाला अटक केली असून तो जेलमध्ये अटक केली आहे. मेडिकल रिपोर्टमध्ये गंभीर गोष्टी समोर आल्या आहेत. आता एकाच व्यक्तीवर गुन्हा दाखल आहे. त्यामुळे इतर काहीजण यामध्ये सहभागी आहेत. यात आई, वडील, भाऊ, डॉक्टर जो गोळ्या देत होता. त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पडळकरांनी केली आहे. पोलिसांनी तपास करू, असा शद्ब दिला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री याच्या कानावर ही गोष्ट घातली आहे, असेही त्यांनी सांगितले.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी