राज्यात सर्वत्र सध्या नवरात्रोत्सवाची तयारी सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण सोमवार 26 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवानिमित्त प्रवाशांसाठी खास सवलत सुरू केली आहे. या सवलतीनुसार, 19 रुपयांच्या तिकिटावर 10 बसफेऱ्यांची मुभा असणार आहे. त्यामुळे 10 दिवसांत कधीही 9 फेऱ्यांचा प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टने जादा बसेस सुरू करण्याची देखील घोषणा केली आहे. बेस्टच्या निवेदनानुसार २६ सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत 26 अतिरिक्त सेवा चालवण्यात येणार आहेत.
चलो अॅप डाउनलोड केल्यानंतर बसपास पर्याय हा निवडावा. बसपास पर्याय निवडल्यानंतर दसरा ऑफर पर्याय निवडावा. त्यानंतर माहिती भरल्यानंतर डेबिट कार्ड, यूपीए, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगद्वारे 19 रुपयांचे तिकीट मिळणार आहे. या 19 रुपयांमध्ये 9 दिवस 10 वेळा प्रवास करता येणार आहे.
स्टच्या अतिरिक्त सेवा या मार्गांवर चालतील
गेटवे ऑफ इंडिया आणि जुहू बीच मार्गे महर्षी कर्वे रोड
तारदेव, हाजी अली
वरळी सी फेस,
वांद्रे एसव्ही रोड,
लिंकिंग रोड,
जुहू तारा रोड ते जुहू बीच