महाराष्ट्र

अवघे 10 दिवस अन् जळगाव महापालिकेवर फडकला शिवसेनेचा भगवा, एकनाथ खडसेंनी दिली माहिती

Published by : Lokshahi News

जळगाव महानगरपालिकेत भाजपाचे संख्याबळ अधिक असून देखील महापौर निवडणुकीत शिवसेनेने विजय मिळवला. शिवसेनेने भाजपाला मोठे खिंडार पाडून माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश महजन यांना धक्का दिला. अवघ्या 10 दिवसांत भाजपाचा डाव उलटवला, असे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले.

भाजपामध्ये डावलले गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी ही सर्व सूत्रे फिरवली. या सर्व गोष्टींचे असे नियोजन झाले की, कोणालाच थांगपत्ता लागला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली होती. महापौरपदासाठी उमेदवार उभा करा. बाकी पुढे मी जुळवून आणतो, असे त्यांना सांगितले. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि विनायक राऊत यांच्याशी देखील चर्चा झाली, असे खडसे म्हणाले.

सर्व हालचाली अतिशय गुप्तपणे सुरू होत्या. महापालिकेत भाजपाचा अनागोंदी कारभार सुरू होता. काम होत नसल्याने लोकांमध्ये नाराजी होती. त्याच्याशी येथील नेतृत्त्वाकडूनही तशी चांगली वागणूक मिळत नव्हती. परिणामी नगरसेवकांमध्येही तसेच वातावरण होते. त्यामुळे फार काही करावे लागले नाही. यातले बरेच नगरसेवक मला आधी भेटूनही गेले होते. कोणताही आग्रह न धरता, नगरसेवक भाजपातून बाहेर पडले, असे त्यांनी सांगितले.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी