मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्याला झोडले आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यातील बऱ्याच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अशातच तारळी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस असलेने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. धरणातील पाणी पातळी निर्धारित पातळी पेक्षा अधिक होताच आज दुपारी 4 वाजलेनंतर नदीपात्रात 8000 क्यूसेक विसर्ग तारळी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.
धरणातील पाणी पातळी निर्धारित पाणी पातळी पेक्षा अधिक झाल्याने आज दुपारी 2 वाजता सांडव्याची चारही वक्रद्वारे 0.50 मीटरने उचलून 1696 क्यूसेक व विद्युत गृहातून 500 क्यूसेक असा एकूण 2196 क्यूसेक विसर्ग उरमोडी नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. तसेच पर्जन्यमान व आवक वाढल्यास विसर्गात वाढ करण्यात येणार असून उरमोडी नदीकाठावरील ग्रामस्थांनी नदीपात्रात प्रवेश न करण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे.