भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्यासंदर्भात भाष्य केल्यानंतर याप्रकरणात दिलगिरी व्यक्त केली. मात्र आता शिवसैनिकांनी भाजपावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. संजय राऊत यांनीही कडव्या भाषेत प्रत्युत्तर दिलं. भाजपाने या प्रकरणावर कोणतीही अधिकृत भूमिका घेतली नव्हती. मात्र आता देवेंद्र फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
"तोडफोड करणं आमची संस्कृती नाही, आम्ही तोडफोड करत नाही", असं फडणवीस म्हणाले आहेत. तसेच, "आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही, आलं तर सोडत नाही", असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.