राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रवी राणा यांना दिलेला शब्द पाळल्याचे पाहायला मिळाले. तुम्ही उदघाटन करून घ्या, मी पाहाणी करायला येईन, असे देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रवी राणा यांना सांगितले होते. त्यानुसार आमदार रवी राणा यांनी उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे लोकार्पण केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज अचानकपणे अमरावतीत आले. त्यांनी राजापेठ रेल्वे उड्डाणपुल व भुयारी मार्गाची पाहणी करून दिलेला शब्द पाळला व आमदार रवी राणा यांनी सातत्याने केलेल्या पाठपुरावा व प्रयत्नांचे कौतुक केले.
या उड्डाणपूल व भुयारी मार्ग निर्मितीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कार्यकाळात 45 कोटींच्या निधीची तरतूद करून केलेल्या सहकार्याबद्दल रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.