Devendra Fadnavis  Team Lokshahi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

Devendra Fadnavis यांची ट्विटरद्वारे माहिती

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची (Corona Virus) लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विटवरुन माहिती दिली आहे. दरम्यान, कॉंग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

देवेंद्र फडणवीस यांनी मला करोनाची लागण झाली असून मी गृह विलगीकरणात असल्याचे ट्वीटमध्ये म्हंटले आहे. तसंच, माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करावी, असे आवाहन त्यांनी म्हंटले आहे. तर, ऑक्टोबर २०२०मध्येही देवेंद्र फडणवीसांना करोनाची लागण झाली होती. तेव्हा फडणवीसांनी खासगी रुग्णालयात न जाता सरकारी रुग्णालयात दाखल होत उपचार घेतले होते.

दरम्यान, राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून 1,357 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्याची चिंता वाढली असून आरोग्य यंत्रणा सतर्कतेवर आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यात रुग्ण वाढत आहेत. मात्र, या रुग्णांना सौम्य लक्षणे असून रुग्ण बरे होत आहेत

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी