महाराष्ट्र

Rain Update : तानसा नदीने गाठली धोक्याची पातळी, पूर्वे भागाला फटका; अनेक रस्ते पाण्याखाली

गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने वसईतल्या तानसा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. परिणामी वसईतील काही पुल पाण्याखाली गेले.

Published by : Shweta Chavan-Zagade

गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने वसईतल्या तानसा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. परिणामी वसईतील काही पुल पाण्याखाली गेले. या सतत पडणाऱ्या पावसाचा मोठा फटका वसई पूर्वेच्या भागाला बसला आहे. जुलै महिन्याची सुरुवात होताच पावसाने वसई, विरारच्या भागात मुसळधार पाऊस कोसळू लागला आहे. दुसऱ्या दिवशीही अधूनमधून मुसळधार पाऊस हा सुरूच होता. यामुळे शहरांमधील सखल भाग पाण्याखाली गेले होते. तसेच तानसा नदीने धोक्याची पातळी गाठल्याने सर्व पाणी हे सायवन मेढे पुलाजवळील मुख्य रस्त्यावरून वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

वसईतील तानसा नदीवर असलेला जुना सायवन- मेढे पूल धोकादायक बनल्यामुळे या भागात नवीन पूल तयार करण्यात आला आहे. नवीन पूल जरी पाण्याखाली गेला नसला तरी त्या पुलीकडे जाणारा रस्ताच पाण्याखाली जाऊन या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी वडघर, कळभोन, आंबोडे, मेढ, भिनार यांच्या सह विविध खेडय़ापाडय़ांतील नागरिकांना आता लांब पल्ल्याच्या महामार्गावरील भालिवली भाताणे या एकमेव रस्त्याचा आधार घ्यावा लागत आहे.

वसईतील तानसा नदीपलीकडील नवसई , भाताणे ,आडणे , मेढे ,भिनार या मुख्य गावांसह जवळपास २० ते ३० पाडे यांचा पाऊस जास्त झाल्यावर संपर्क तुटतो. मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने पांढर तारा पूल ही पाण्याखाली गेला आहे. नदी पलीकडील नागरिकांना जास्त अंतराच्या महामार्गाचा वापर करावा लागत आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी