महाराष्ट्र

सायबर भामटे वरचढ! भाजपच्या ४ महिला आमदारांनाच लावला चुना

Cyber Crime : पुण्यासह राज्यातील 3 आमदारांचा यात समावेश

Published by : Shweta Shigvan-Kavankar

चंद्रशेखर भांगे | पुणे :

माझी आई आजारी असल्याचे सांगत एक सायबर भामट्याने (Cyber Crime) थेट भाजपच्या महिला आमदारांनाच (BJP MLA) फसविले आहे. पुण्यासह राज्यातील 3 आमदारांचा यात समावेश आहे. या प्रकरणी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुकेश राठोड असे सायबर भामट्याचे नाव असून माझी आई पुणे येथील बाणेर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे. तिच्या उपचारासाठी पैशांची मदत करा, असे त्याने भाजप महिला आमदारांना सांगितले होते. महिला आमदारांच्या मोबाईलवर संपर्क साधून त्याने त्यांच्याकडून हजारो रुपये उकळले आहेत.

यामध्ये पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर, नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे, चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांचा समावेश आहे.

याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली असून थेट भाजपच्या आमदारांची फसवणूक झाल्याने पोलिसांना सायबर भामट्याने एक प्रकारे आव्हानच दिले आहे. दरम्यान, आतापर्यंत सामान्य वर्ग सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकत होते. परंतु, आता महिला आमदारांनाच सायबर भामट्यांनी लक्ष्य केले आहे.

यांची केली फसवणूक

आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई आजारी होती म्हणून एका अज्ञात व्यक्तीने या महिला आमदारांना मदत मागितली होती. लोकप्रतिनिधी म्हणून अनेक जण वेगवेगळ्या प्रकारची मदत मागत असतात आणि त्यामुळे एका तरुणाचा फोन आला आणि त्यांनी त्याची आई आजारी असल्याचा सांगत पैशांचे मागणी केली त्यामुळे संवेदनशील कारण ऐकून तातडीने त्याला पैसे पाठवले मात्र त्यानंतर अशीच फसवणूक इतर महिला आमदारांचे पण झाल्याचं लक्षात आल्यानंतर याबाबत तक्रार दिली असल्याचं आमदार माधुरी मिसाळ यांनी म्हटलय....आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडून ४ हजार रुपये उकळले होते. गुगलपे च्या माध्यमातून पैसे दिले असल्याचं मिसाळ यांनी सांगितल आहे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी