महाराष्ट्र

Priyanka Gandhi : प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात; काँग्रेसकडून उमेदवारीची घोषणा

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच काल निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

Published by : shweta walge

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच काल निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची निवडणूक आयोगाने घोषणा केल्यानंतर काँग्रेसने प्रियांका गांधी वाड्रा यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली आहे.

काँग्रेसकडून तीन जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यापैकी, केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून प्रियांका गांधी वाड्रा, केरळमधील पलक्कड विधानसभा मतदारसंघातून राहुल ममकुटाथिल आणि चेलक्क्कारा (अनुसूचित जाती) मधून रम्या हरिदास यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

लोकसभेला दोन मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी वायनाडची जागा सोडली होती. या ठिकाणी आज पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पण काँग्रेस या ठिकाणाहून प्रियांका गांधी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं अखेर प्रियांका गांधी या निवडणूक रिंगणात दाखल झाल्या आहेत. २० नोव्हेंबर रोजी या ठिकाणी मतदान होणार आहे.

दरम्यान, राहुल गांधी 2019 मध्ये वायनाडमधून निवडून आले होते. यावेळी त्यांनी वायनाडसह रायबरेलीतूनही बाजी मारली. रायबरेलीतून राहुल यांना 3 लाख 90 हजारांचे तर वायनाडमध्ये 3 लाख 64 हजारांच्या मताधिक्य मिळाले आहे.

परिणामी दोन्हीपैकी कोणता मतदारसंघ निवडायचा याबाबत राहुल गांधींसह काँग्रेसपुढे भावनिक पेच निर्माण झाला होता. यातून मार्ग काढत खर्गे यांनी राहुल गांधी वायनाडमधून राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. तर त्या जागेवरून प्रियांका गांधी लढणार असल्याचीही घोषणा केली.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी