राज्यात पुन्हा एकदा कोरोना (corona) रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज रात्री ८ वाजता मुख्यमंत्र्यांसोबत टास्क फोर्स (Task Force) ची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री राज्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. राज्यातले रुग्ण वाढल्यास मास्क बंधनकारक करण्याचा विचार करावा लागेल, असं विधान अजित पवारांनी (Deputy CM Ajit Pawar) केलं होतं.
आज रात्री होणाऱ्या या आरोग्य विभागाचे सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार आहेत. या बैठकीत कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने उपयायोजनांचा आढावा घेतला जाणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांमध्ये आणखी काही निर्देश जारी करण्याबाबत या बैठकीत निर्णय होणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय घेतले जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
राज्यात जवळपास दीड हजारांच्या जवळ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली होती. दरम्यान, वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची (State Cabinet Meeting ) बैठक सुरू झाली आहे. यामध्ये कोरोनाच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली जाणार असून, बैठकीमध्ये मास्क सक्तीबाबत (Face Mask) निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.