मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या नव्या इमारतीचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
मुख्यमंत्र्यांबरोबरच केंद्रीय कायदे व न्याय मंत्री किरण रीजीजू , सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन.व्ही रमण्णा, पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार इम्तियाज जलील, मंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, तसंच विविध लोकप्रतिनिधी आणि महत्त्वाचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.
कसा असेल मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा?
- ०८.०० वा. मातोश्री निवासस्थान येथून मोटारीने सांताक्रूजकडे प्रयाण
- ०८.१० वा. छत्रपती शिवाजी.महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सांताक्रूज येथे आगमन
- ०८.१५ वा. विमानाने औरंगाबादकडे प्रयाण
- ०९.०५ वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन
- ०९.१० वा. मोटारीने मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानी विस्तारीत इमारत, सिडकोकडे प्रयाण मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची विस्तारीत इमारत, सिडको येथे आगमन व राखीव
- ०९.२० वा. न्या. एन.व्ही. रमण्णा, भारताचे मुख्य न्यायाधीश यांचे आगमन
- ०९.४५- उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारीत इमारतीचं उद्घाटन