CM Eknath Shinde Team Lokshahi
महाराष्ट्र

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानसभेत तीन मोठ्या घोषणा

हिरकणी गाव वाचवण्याकरता 21 कोटींचा निधी मंजूर केलाय. तर शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र आम्ही करणार अशा तीन मोठ्या घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

Published by : Shweta Chavan-Zagade

शिवसेनेच्या बंडखोर गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. २८७ आमदारांपैकी १६४ मते शिंदे सरकार मिळाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बहुमत चाचणी जिंकली. याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत भाषणावेळी तीन मोठ्या घोषणा केल्या. राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरचा कर लवकरच कमी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. हिरकणी गाव वाचवण्याकरता 21 कोटींचा निधी मंजूर केलाय. तर शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र आम्ही करणार अशा तीन मोठ्या घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

यावेळी शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र व्हावा, शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा. जलयुक्त शिवार सारथे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल करण्याचा संकल्प सरकारने केला आहे.

पंतप्रधान मोदींनी इंधनावरील व्हॅट कमी करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार लवकरच कॅबिनेट बैठकीत पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्यासाठी निर्णय घेणार आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी केली. त्याच धरतीवर आता राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात येईल. त्यामुळे त्याचा फायदा हा राज्यातील जनतेला होणार आहे. येत्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात येणार आहे.

तर शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र आम्ही करणार असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी