महाराष्ट्र

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर; महामार्गांवरील जड-अवजड वाहतूक राहणार बंद

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुण्यातील बालेवाडीत शुभारंभ करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात आज योजनेचा शुभारंभ होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर पुणे-सोलापूर, पुणे-सातारा, पुणे-नगर, पुणे-नाशिक, पुणे-मुंबई जुना महामार्ग आणि पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग या सर्व महामार्गांवरील सर्व प्रकारची जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

महामार्गांवरील सर्व प्रकारची जड-अवजड वाहतूक बंद राहणार आहे तसेच रात्री बारा वाजेपर्यंत ही वाहतूक बंद राहणार आहे. असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

Kokan Vidhansabha: रत्नागिरीत सामंत तर सिंधुदुर्गात राणे बंधूंची हवा

Sanjay Rathore Win Digras Vidhan Sabha Election Result 2024; दिग्रस मतदारसंघात संजय राठोड पाचव्यांदा विजयी

Uddhav Thackeray: विधानसभेचा निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित: उद्धव ठाकरे