आज केंद्रीय पथक मराठवाड्यात दाखल होणार आहे. आज आणि उद्या मराठवाड्यातील चार जिल्ह्यात त्यांच्याकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे एक त्रिसदस्यीय पथक आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत आहे.
आज मराठवाड्यात पाहणी केल्यानंतर ते उद्या उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पाहणी करणार आहेत. केंद्रीय कृषी विभागाच्या सहसचिव प्रिया राजन या पथकप्रमुख आहेत त्यांच्या नेतृत्वात चार पथक तयार करण्यात आले आहेत.
हे पथक मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्याचा आजपासून दोन दिवसीय दौरा करणार आहे. जिल्ह्यातील निर्माण झालेल्या दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल झाले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे 12 सदस्यांचे हे पथक आहे.