शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची आणून दिल्याचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.या फोटोवरून राऊत यांच्यावर फार टीका झाली. यावर संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. यावर आता नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर नारायण राणे यांनी टीका केलीय. ते शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. दिल्लीत ते राष्ट्रवादीच्याच कार्यालयात असतात. त्यांना शिवसेनेविषयी कोणतीही निष्ठा नाही, प्रामाणिक नाही. ते कधी होते शिवसेनेत, काय केलं पक्षासाठी, असा सवाल त्यांनी केलाय. ते बोलतात तसे नाहीत. एका खासदाराला, वृत्तपत्राच्या संपादकाला अशाप्रकारची भाषा शोभत नाही, असा हल्लाबोल त्यांनी केलाय.