विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात राजकीय भूकंप पाहायला मिळत आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) धुसफूस बाहेर येऊ लागली आहे. या निकालानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा फोन कालपासून नॉट रिचेबल आहे. तर एकनाथ शिंदे पक्षाच्या काही आमदारांच्या गटासह सूरतमध्ये मुक्कामाला आहेत. याचदरम्यान अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितिन देशमुख सूरतमधे एकनाथ शिंदेंसोबत होते. तिथे त्यांना पहाटे छातीत दुखू लागल्याने पहाटे सुरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले.
बाळापूरचे आमदार नितिन देशमुख सूरतमधे एकनाथ शिंदेंसोबत होते. तिथे त्यांना पहाटे छातीत दुखू लागल्याने पहाटे 4 च्या सुमाराला सुरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना गंभीर अवस्थेत नवीन सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष कक्ष क्रमांक 15 मध्ये उपचार सुरू आहेत. हॉस्पिटलमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. माध्यमांनाही कक्षात जाण्यापासून रोखण्यात आले.