कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे औरंगाबाद जिल्हा न्यायालय सह इतर न्यायालयांचे कामकाज हे बंद होते, परंतु आता पुन्हा न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून शंभर टक्के क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा न्यायाधीश श्रीपाद डी टेकाळे यांनी दिली आहे.
शहरातील न्यायालयाचे कामकाज शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्यात असून तालुका न्यायालया मधील कामकाज ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने कामकाजाचे नवीन दिशा निर्देश जारी केल्या नंतर जिल्हा आणि तालुका न्यायालयाच्या कामकाजासंबंधी नव्याने रूपरेषा आखण्यात आली आहे.