मतदान काही तासावर आले असताना छत्रपती संभाजी पश्चिमचे शिवसेना उमेदवार संजय शिरसाठ यांच्या गाडीवर आज्ञात लोकांनी हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. त्यांचा मुलगा सिध्दांत शिरसाट गाडीत असताना हा प्रकार घडला. माझ्यावर झालेला हल्ला हा विरोधात उभे असलेले उमेदवार राजु शिंदे यांनी केला आहे असा आरोप संजय शिरसाट यांनी लावला.
हल्ल्याबाबत अद्याप तपशील समोर आलेले नाही. मात्र गाडीवर मागून हल्ला झाला आहे, ज्यात गाडीच्या काचा फुटलेल्या दिसत आहेत. हल्ला झाला तेव्हा गाडीत संजय शिरसाट यांचा पुत्र होता. हल्ल्यात कोणालाही इजा झालेली नाही. हल्ला झाल्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.
दरम्यान, 18 नोव्हेबर रोजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर हल्ला झाला होता. त्यानंतर आता ही घटना घडली आहे.