महाराष्ट्र

…म्हणून आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

Published by : Lokshahi News

भाजप नेते आशिष शेलार (ashish shelar) यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. मात्र, शेलारांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

आशिष शेलार यांनी ही भेट केवळ दिवाळी शुभेच्छांसाठी असल्याचं म्हटलं असलं तरी राजकीय नेत्यांच्या प्रत्येक भेटीत भविष्यातील राजकीय वाटचालीची चर्चा होत असल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे मागील काही काळापासून मनसेने आपला अजेंडा मराठी माणसापासून हिंदुत्वाकडे नेलाय. याचाच भाग म्हणून मनसेच्या पक्ष झेंड्यातही बदल करण्यात आला. तसेच राज ठाकरे यांच्या भाषणातील भाषाही काहीशी बदललेली पाहायला मिळत असल्याचं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, याआधी साध्वी कांचनगिरी यांनी मुंबईत येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी राज ठाकरेंची विचारसरणी हिंदु राष्ट्राची असल्याचं विधान त्यांनी केलं होतं. तसेच मुंबईसह महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांना राज ठाकरेंना पाठिंबा द्यावं असं आवाहनही केलं होतं.

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी

Eknath Shinde Will be next CM? एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद?

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे