राज्यात सर्वत्र तिसऱ्या स्तराचे नियम लागू करण्यात आले असून फेरीवाले तसेच किरकोळ भाजीपाला विक्रीला संध्याकाळी ४ वाजेपर्यंतच वेळ देण्यात आलीये. किरकोळ विक्रेते भाजीपाला घेऊन आपल्या जागेवर पोहचे पर्यंत विक्रीची वेळ निघून जात असल्याने त्यांचा माल असाच पडून राहतोय. त्यामुळे विक्रेता दुसऱ्या दिवशी मार्केटला फिरकत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.
बाजारात ग्राहक नसल्याचा परिणाम भाजीपाला व्यवसायावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय शनिवार, रविवार दोन दिवस कडक टाळेबंदी असल्याने आज भाजीपाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात माल पडून असल्याचे पाहायला मिळात आहे शिवाय काही भाज्यांच्या दरात थेट ५० टक्के घसरण झाली.