जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अण्णांना कुठलाही त्रास होत नसल्याची हॉस्पिटलकडून माहिती मिळाली आहे. रुटीन चेकअपसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रुटीन चेकअपसाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अण्णा हजारे रुटीन चेकअपसाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.रुबी हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने अण्णांच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. दर तीन महिन्यांनी अण्णा हजारे यांचे रुटीन चेकअप केले जाते. कोरोनामुळे वर्षभरात अण्णांनी रूटीन चेकअप केले नव्हते. त्यामुळे चेकअपसाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत.अण्णांना कुठलाही त्रास होत नसल्याची हॉस्पिटलकडून माहिती मिळत आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रकृतीची चौकशी करून त्यांच्या प्रकृतीला आराम मिळावा अशी भावना व्यक्त केली. तसेच ते लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त केली.