minor girl Team Lokshahi
महाराष्ट्र

दोन दिवसांत दोन फाशी : जुहू बलात्कार प्रकरणातील आरोपीलाही फाशीच

Juhu Rape And Murder प्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाचा निर्णय

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणात गुरुवारी आरोपीला फाशीची शिक्षा झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जुहू परिसरामध्ये नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी (Juhu Rape And Murder) न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. आरोपीला दिंडोशी सत्र न्यायालयाने (Dindoshi Sessions Court) फाशीची शिक्षा दिली. वड्डी ऊर्फ गुंडप्पा देवेंद्र असे आरोपीचे नाव आहे.

जुहू परिसरात एप्रिल २०१९ मध्ये एका सार्वजनिक शौचालयात नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणात परिसरातील वड्डी ऊर्फ गुंडप्पा देवेंद्र याने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती.

वड्डी याने यापूर्वीही सन २०१७ मध्ये लैगिंक अत्याचार केला होता आणि या प्रकरणात तो जामिनावर बाहेर होता. चौकशीमध्ये वड्डी उडवा-उडवीची उत्तरे देत होता. मात्र, एका सीसीटीव्ही फूटेजमध्ये तो मुलीसोबत दिसल्याने पोलिसांनी चौकशीचा फास आवळल्यावर वड्डी याने गुन्ह्याची कबुली दिली. या घृणास्पद प्रकारामुळे जुहू परिसरात संतापाची लाट पसरली. संतप्त नागरिकांनी जुहू पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला होता.

दरम्यान, गुरुवारी साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीलाही दिंडोशी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली होती. यापाठोपाठ आज जुहू बलात्कार आणि हत्या प्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने वड्डी ऊर्फ गुंडप्पा देवेंद्र याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी