महाराष्ट्र

कोल्हापुरात आम आदमी पार्टीच्या वतीने टक्केवारीची ‘हंडी फोडो’ आंदोलन

Published by : Lokshahi News

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर महापालिका कॉन्ट्रॅक्टर या व्हॉट्सअॅप ग्रुपवर "काम देताना जे ठरले ते करायचं जास्त लांबड लावायचा नाही" असा संदेश व्हायरल होत होता. महापालिकेच्या विकास कामात चालत असणाऱ्या टक्केवारी पद्धतीचं पितळ या संभाषणातून उघडे पडले असून याविरोधात आम आदमी पार्टीने महानगरपालिकेसमोर टक्केवारीची हांडी फोड आंदोलन केले.

यावेळी दहीहंडी सजवून त्यावर 18% टक्के असा उल्लेख केला होता. महानगरपालिकेचा परिसर घोषणाबाजीने दणाणून गेला होता. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी हंडी फोडत निषेध व्यक्त केला. तब्बल 18 टक्के रकमेचा उल्लेख व्हायरल झालेल्या संभाषणात आहे.

जनतेचा पैसा लुबाडून संस्कृती रोड करत शहराचे नाव बदनाम केले जात आहे. अशा प्रवृत्तीला वेळेस आळा घातला पाहिजे. नाहीतर कोल्हापुरातील एकही प्रकल्प पूर्णत्वास जाणार नाही, असे आम आदमी पार्टीचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी