राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. राज्यभरात ग्रामपंचायत निवडणूक निकालाचा जल्लोष सुरु आहे. या ग्रामपंचायतीच्या निकालाने सगळ्यांचे लक्षया लागले आहे. मात्र, विशेष म्हणजे आम आदमी पार्टीने ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रात खाते उघडले आहे. पाथरी ग्रामपंचायतीत सरपंच पदाकरिता आम आदमी पार्टीच्या विद्या गुरुदास कोहळे या विजयी झाल्या आहेत.
निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या
अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751.