रवी जयस्वाल | अकोल्यातील एका 8 वर्षाच्या चिमुकलीला एचआयव्हीची बाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी चिमुकलीच्या कुटूंबियांनी रक्तातून एचआयव्हीची बाधा झाल्याचा आऱोप केला होता, तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे न्याय मांगितला होता. यावर आता या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
अकोल्यातील मूर्तिजापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना एका आठ महिन्याच्या चिमुकलीचा ताप काही केल्या कमी होत नव्हता. डॉक्टरांनी विविध तपासण्या केल्यानंतर चिमुकलीच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यासाठी पांढऱ्या रक्ताची आवश्यकता आहे ते तिला देणे गरजेचे असून अकोला येथील बी. पी. ठाकरे रक्तपेढीतून रक्त आण्याचा सल्ला चिमुकलीच्या पित्याला देण्यात आला होता. त्यानुसार पित्याने रक्त आणत ठरल्याप्रमाणे संकलीत केलेले रक्त आठ महिन्याच्या चिमुकलीला देण्यात आले परंतु काही केल्या तिचा ताप व पेशी वाढत नव्हत्या. त्यामुळे जास्त वेळ न दवडता चिमुकलीला मूर्तिजापूर येथून अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांना एचआयव्ही असल्याचा संशय आल्याने चिमुकलीची एचआयव्ही तपासणी करण्यास सांगीतले. तपासणीअंती तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांनी आई-वडीलांना एचआयव्ही तपासणी करण्यास सांगीतले तेव्हा दोघांचाही अहवाल निगेटिव्ह आला. तोघांचाही अहवाल निगेटिव्ह असताना मुलगी पॉझिटिव्ह कशी ? ही शंका त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.त्या दिशेने शोध घेतला असता संक्रमित रक्त चढविल्याने तिही संक्रमित झाल्याचे संशय तिच्या माता पित्यांना आला. ह्या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी चिमुकलीच्या नातेवाईकांनी आरोग्य मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यासह विविध ठिकाणी तक्रार दाखल केली आहे.